पाककृती

आम काशुंदी

एका चटकदार बंगाली चटणीसाठी सज्ज करा.

कृती:

 1. अर्धा कप मोहरी(मोहरीची डाळ आणि अख्खी मोहरी) एक तास पाण्यात भिजवा. तासाभराने चिमुटभर मीठ घालून बारीक वाटुन घ्या.
 2. २-३ आंब्यांच्या फोडी, मिरच्या (चवीनुसार), हळद (१ चमचा), मीठ आणि साखर मोहरीच्या वाटणात घाला व चांगले एकजीव करून घ्या.
 3. एका काचेच्या भांड्यात तयार केलेले मिश्रण आणि ५ चमचे मोहरीचे तेल घाला आणि नीट एकत्र मिसळा आणि भांडे मलमलच्या कापडात गुंडाळून ठेवा. २-३ दिवसासाठी सूर्यप्रकशात ठेवा.

आपले आम काशुंदी खाण्यास तयार आहे. गरम भात, तळलेले मासे किवा खरपूस तळलेले सोबत वाढावे.

पारसी आंब्याचे ऑमलेट.

कमी नावाजलेले परंतु स्वादिष्ट ऑमलेट.

कृती:

 1. २ अंडी + बारीक चिरलेला कांदा + कोथिंबीर + १ बारीक चिरलेली हिरवी मिरची +१चमचा चिरलेली कैरी + आले-लसूणाचे वाटण(हवेअसल्यास) + चिमुटभर हळद आणि मीठ एकत्र फेटून घ्या.
 2. तयार मिश्रण तव्यावर पसरवुन दोन्ही बाजूने शिजवुन घ्या.

पारसी आंब्याचा ऑमलेट, चपाती किंवा ब्रेड सोबत खाण्यास तयार आहे.

कोळंबीचे कैरी घातलेले कालवण

कोळंबीचे कालवण बनण्याची ही एक कृती आहे.

कृती:

 1. एका कप पाण्यात ३-४ चिंचा भिजवून ठेवा, थोड्या वेळाने पाणी काढून टाका आणि कोळ बनवून घ्या.
 2. १५ कोळंब्या पाण्याने स्वच्छ धुवुन मीठ लावुन अर्ध्यातास ठेवा.
 3. ३ चमचे नारळाचे वाटण + अर्धा कांदा + लसुणाच्या ४ पाकळ्या + ३/४ -इंच आल्याचा तुकडा + ८ लाल काश्मीरी मिरच्या + १ चमचा जिरे + १ चमचा धणे + अर्धा चमचा खसखस एकत्रित करून बारीक वाटून घ्या.
 4. कढईत तेल गरम करून त्यात कांदा, हिरवी मिरची परतुन घ्या नंतर त्यात वाटण घालुन व्यवस्थित परता.
 5. त्यानंतर २ कप पाणी + चिमूटभर हळद + चिंचेचा कोळ + कैरीचे काप घालून, झाकण ठेवावे आणि ७ ते ८ मी पर्यंत शिजवावे.

गरमागरम भाता सोबत कोळंबीचे कालवण खाण्यास तयार आहे.

एग्लेस आंब्याचा मुज्स

हलका आणि चविष्ट.

कृती:

 1. एका भांड्यात, आर डी कोकण आंब्यांच्या रस घ्या, त्यामध्ये १/४ चमचा व्हिनेगर घालुन मिक्स करा.
 2. दुसऱ्या भांड्यात क्रीम आणि २ चमचे साखर एकत्र फेटून घ्या. आणि ५ मीं बाजूला ठेवून द्या.
 3. एका भांड्यात ३/४ भाग पर्यंत थोडे थोडे दोन्ही भांड्यातील मिश्रण घालावे आणि एकजीव करून घ्यावे. त्यानंतर
 4. उरलेल्या भागात आमरस घालून थंड करावा.
 5. खाण्यापुर्वी ६ तास फ्रीझमध्ये थंड करा.

बदामाचे बरिक तूकडे करून सजवा आणि थंडगार केक वाढा.

आंबा संदेश

आपल्या दिवसाला उज्वल करण्यास पनीर तयार आहे.

कृती:

 1. २ लिटर दुध घेऊन ते तापवत ठेवा, उकळी फुटल्यावर त्यात ३/४ वाटी दही घालुन ढवळा. त्याने दूध फाटेल, थोडा वेळाने सफेद घट्ट गोळा वेगळा होऊन पाणी वेगळे होऊ लागेल. तेव्हा गॅस बंद करा.
 2. त्यात त्वरित १० बर्फाचे तुकडे घाला. ५ मिनिटे तसेच ठेवा.
 3. तयार पांढरा भाग म्हणजेच पनीर मलमलच्या कापडात गुंढाळून ४५ मिंटापर्यंत ठेवा.
 4. त्यातील पाणी संपूर्णपणे निथरल्यावर पनीर १० मिंटापर्यंत नीट मळून घ्या. १/३ कप + १/२ टेस्पून वेलचीची पुड घाला आणि चांगले मिसळा.
 5. तयार मिश्रण आणि १/२ कप आमरस एकत्रितपाने तापलेल्या तव्यावर घाला, सतत ढवळा आणि मंद आचेवर शिजवा.
 6. मिश्रण जेव्हा तव्याच्या मध्यावर येऊन गोळा होते तेव्हा ते नीट शिजले आहे असे समजावे.
 7. एका ताटाला तुप लावून त्या ताटात हे मिश्रण काढून घ्यावे. थंड झाल्यावर हलक्या हाताने मळावे आणि एक गोळा बनवुन घ्यावा
 8. त्यात बोटाने पोकळी बनवून त्यात सुकामेवा भरवा.

चविष्ट आंबादेश तयार आहे.

आम्बराखंड सोबत आंब्याचे सलाड

तुमच्या हृदयात तरंग तयार करणारा गोडवा.

कृती:

 1. मलमलच्या कापडात दही घेऊन त्याचे पाणी निथरुन घ्या. आणि २ ते ३ तासासाठी उंचावर अडकवून ठेवा म्हणजे त्यातील पूर्ण पाणी निथरुन जाईल.
 2. १ आर डी कोकण आंब्याचा रस + १ चमचा वेलची पूड + १ चिमुट केसर + १/४ कप पिठीसाखर घाला आणि थंड करा.
 3. पर्यायी(2 टेस्पून उबदार दुधात केसरचे काही तुकडे भिजवा. हे काही मिनिटांसाठी थंड करा आणि आपल्या मिश्रणात घाला.)
 4. वाढताना बदाम आणि पिस्तासह सजवा.

गरमागरम पुरी किंवा तुकडे / आमांचे तुकड्यांसोबत आस्वाद घ्या.